माझा हस्तक्षेप : मुंबई-पुण्याची दूधकोंडी कशासाठी?
Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्रीपासून दूध आंदोलन सुरु केलं आहे. अनेक प्रमुख शहरांना होणारा दुधपुरवठा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखला आहे. दुधाला प्रतिलीटर ५ रुपयांची दरवाढ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. मुंबईच्या दुधपुरवठ्यावर अद्याप याचा कोणतीही परिणाम झाला नाहीये मात्र पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर दूधाचा पुरवठा रोखण्यात आलाय. पुण्यात तर रस्त्यावर दूध फेकून देण्यात आलंय.
गोकुळसह काही दूध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. सोलापुरातील माढा आणि सांगोला तालुक्यात दूध रस्त्यावर ओतून स्वाभीमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले...
अमरावतीत राजू शेट्टींच्या काही कार्यकर्त्यांनी दुधाचा एक टँकर फोडण्याचा प्रयत्न केला... दूध उत्पादकांसाठी पुकारलेल्या या आंदोलनाला राज्यातल्या अनेक भागात हिंसक वळण लागतंय.. मात्र तरीही राजू शेट्टी आंदोलनावर ठाम आहेत. पूर्वाश्रमीचे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि सध्या कृषीराज्यमंत्री असलेल्या सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींवर टीकास्त्र सोडलंय.. केवळ एका माणसाची राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दूध उत्पादकांना वेठीला धरायचा हा प्रकार असल्याची टीका त्यांनी केलेय.. दुसरीकडे राज्यातील बहुतेक दूधसंघ हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत त्यामुळे सरकार अनुदान किंवा इतर कोणत्याही हस्तक्षेपासाठी तयार नाही अशी चर्चा दबक्या आवाजात सूरू आहे.. मात्र या सगळ्यात इकडूनक काय आणि तिकडून काय नुकसान दूध उत्पादक गरीब शेतकऱ्याचं होतंय त्यामुळेच या मुद्द्यात चर्चेच्या माध्यमातून आम्ही हस्तक्षेप करतोय आणि समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की नेमकी मागण काय आहे आणि ती पूर्ण करण्यात अडचणी काय आहेत...