माझा हस्तक्षेप : भारतात महिला असुरक्षित?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jun 2018 07:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
थॉमसन रॉयटर्स फाउंडेशनचा महिलांच्या सुरक्षिततेविषयीचा सर्व्हे आला आणि त्यातील फॅक्टस पाहून भुवया उंचावल्या नसत्या तरच नवल.. जगात महिलांसाठी सर्वात असुरक्षित देशांच्या क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.. आणि त्यापेक्षा उद्विग्न करणारी बाब म्हणजे.. अफगाणिस्तान, सिरीया, सोमालिया, सौदी अरेबिया सारखे देश भारताच्या खाली आहेत... .या सर्व्हेमध्ये 548 महिलांना प्रश्न विचारण्यात आले, ज्यामध्ये 43 भारतीय महिलांचा समावेश आहे.
यात आरोग्य, रितीरिवाज, लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी यांबाबत प्रश्न विचारण्यात आले.
यात मानवी तस्करी आणि लैंगिक शोषण यामध्ये भारताची परिस्थिती सर्वाधिक वाईट असल्याचं सर्व्हेक्षणात समोर आलंय. मुळात थॉमसन रॉयटर्स फाउंडेशन सारख्या जबाबदार संस्थेच्या सर्वेक्षणात अशी बाब येणं हे धक्कादायक आहे... अफगाणिस्तान सिरिया सारख्या युद्धप्रवण देशात जिथे महिला घराबाहेर पडणंही मुश्किल आहे ते देश महिलांसाठी भारतापेक्षा सुरक्षित कसे... सौदी सारखा देश जिथे मोठ्या लढ्यानंतर आता कुढे महिलांना वाहन चालवायची परवानगी मिळाली आहे.. हा देश महिलांसाठी भारतापेक्षा सुरक्षित आहे... चक्रावून टाकणारी बाब आहे.. किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची अशी बदनामी ही संतापजनक बाब आहे.. त्यामुळे यातील वस्तुस्थिती समजावून घेण्यासाठी आज या चर्चेच्या माध्यमातून आम्ही हा हस्तक्षेप करत आहोत