माझा हस्तक्षेप : 'निकाह हलाला'चं समर्थन कोणत्या तोंडाने होईल?

Continues below advertisement
त्वरित तिहेरी तलाक प्रथेवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी आणल्याला अवघे काही महिनेच झाले असतना.. आता मुस्लिम समाजारी निगडीत आणखी एक विषय सर्वोच्च न्यायलयात सुनावणीसाठी आला आहे.. मुस्लिम समाजातील हलाला ही प्रथा... या प्रथेला विरोध करणाऱ्या दोन याचिका सध्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात आहेत आणि यावर वेगवान सुनावणी करू असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या बेंचनं सांगितलंय.. सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर याची सुनावणी होणार आहे.. केंद्र सरकारनं महाधिवक्ता के के वेणूगोपाल यांच्या नेतृत्वाखालील समितीला याविषयी कंबर कसून एक मजबूत केस उभी करण्याच्या सूचना केल्या आहेत.. अर्थात केंद्र सरकार हलाला प्रथेच्या विरोधात उभे ठाकणार हे स्पष्टआहे.. मात्र काही राजकीय पक्ष आणि मुस्लिम संघटनांना हे केंद्र सरकाचं राजकारण आहे असं वाटतंय.. अल्पसंख्यांकाच्या पर्सनल लॉ मध्ये भाजप ढवलाढवळ करत असल्याचा आरोप या पक्षांनी आणि संघटनांनी केलाय.. मुळात मुद्दा असा आहे की कोणत्या तोंडानं निकाह हलाला प्रथेचं समर्थन करणार ... त्यामुळेच चर्चेच्या माध्यमातून आम्ही यात ह्स्तक्षेप करत आहोत..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram