मुंबई : अंगणवाडी सेविकांना लावलेल्या 'मेस्मा'वरुन विधानसभेत गदारोळ
Continues below advertisement
अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा त्वरीत रद्द करावा, यावरुन आज विधानसभेत गदारोळ सुरु आहे. शिवसेनेच्या या भूमिकेला विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे. अत्यंत कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवेखाली मेस्मा लावायचाच असेल तर त्यांनाही इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन द्या, अशी मागणी शिवसेनेसह विरोधकांची आहे. मात्र महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मेस्माच्या भूमिकेवर ठाम आहेत. तसंच मानधनवाढीची फक्त घोषणा झालेली असली तरी सरकारनं शासन निर्णय जारी केलेला नाही, असा दावाही शिवसेनेनं केला आहे.
Continues below advertisement