पुण्यात प्रदूषणामुळे धुरक्याचं साम्राज्य, तर सांगलीतही धुक्याची चादर
Continues below advertisement
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर धुक्यांची चादर पसरली. पुणे आणि सांगली शहराला आज दाट धुक्यांनी वेढलं. पुणे तर चहुबाजुंनी टेकड्यांनी वेढलेलं आहे. या टेकड्या धुक्यात गडप झाल्या. धुक्याचा आनंद घेण्यासाठी पहाटेच्यावेळी पुणेकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. महामार्गालगत मात्र प्रदुषणामुळं धुक्याचं रुपांतर धुरक्यात झालं. तिकडे सांगलीत धुक्यामुळं वाहनांचा वेग मंदावला. दाट धुकं आणि गुलांबी थंडीत सांगलीकर रोजचा व्यायाम आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. धुक्याचा एसटी वाहतुकीवर काही काळ परिणाम पाहाय़ला मिळाला.
Continues below advertisement