
मुंबई : एसटी महामंडळातील शिवशाही बसेसमध्ये स्लीपरकोच सेवेला आजपासून सुरुवात
Continues below advertisement
प्रवाशांना सुरक्षीत आणि वक्तशीर प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाकडेही लक्ष दिल्याचं पाहायला मिळतंय. कारण नव्याने सुरु करण्यात आलेल्या शिवशाही श्रेणीतील स्लीपर कोच बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत. आज पहिल्या टप्प्यातील 10 बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या सर्व बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. त्यात चालक ठेकेदाराचा तर वाहक महामंडळाचा असणार आहे. खासगी शयनयान बसपेक्षा या बसचं भाडंही कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, बसचा चालक ठेकेदाराचा ठेवण्यात आल्यानं खासगीकरणाचा घाट तर घातला जात नाही ना असा सवालंही उपस्थित केला जात आहे.
Continues below advertisement