एसटीची तिकीट दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या तिकीटदरात आज (15 जून) मध्यरात्रीपासून 18 टक्के वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला चाप बसणार आहे. डिझेलचे वाढते दर आणि एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही दरवाढ करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळानं सांगितलं आहे.