Maharashtra SSC Result 2019 | दहावीचा निकाल जाहीर, टक्का घसरला, कोकण विभाग अव्वल | ABP Majha
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय. राज्याचा निकाल 77.10 टक्के लागलाय. मात्र, हा गेल्या वर्षीपेक्षा हा निकाल तब्बल 12.21 टक्क्यांनी कमी आहे. बदलेला अभ्यासक्रम आणि इंटरनल गुणांमुळे यंदा निकाल कमी लागल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारलीय. या वर्षी १६ लाख विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती, त्यातील १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे गेल्या ५ वर्षांमधील हा सर्वात कमी निकाल लागला आहे. दरम्यान, कोकण विभागाचा सर्वाधिक तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.