मुंबई : दहावीचा निकाल जाहीर, राज्यात कोकण अव्वल
Continues below advertisement
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ८९.४१ टक्के एवढा लागला आहे. दहावीच्या निकालातही कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६ टक्के एवढा लागलाय. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९१.९७ टक्के एवढ्या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीच्या एकूण ५७ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिकांच्या छायाप्रतींसाठी उद्यापासून अर्ज करता येणार आहेत. परिक्षेत नापास झालेल्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्य़ांना जुलैमध्ये फेरपरिक्षा देता येणार आहे.
Continues below advertisement