मुंबई : विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा तिसरा उमेदवारही जाहीर
Continues below advertisement
विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला तिसरा उमेदवारही घोषित केला आहे. हिंगोली-परभणी येथून विधानपरिषदेसाठी विपुल बजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विपुल बजोरिया हे शिवसेनेचे अकोला-बुलडाणा विधानपरिषदेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बजोरिया यांचे चिरंजीव आहेत.
शिवसेनेचं संख्याबळ जास्त असून आमचा उमेदवार जिंकेल, स्वबळावर निवडणूक जिंकू, असा दावा गोपीकिशन बजोरिया यांनी केला आहे.
शिवसेनेकडून नाशिक विधानपरिषदेसाठी नरेंद्र दराडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे, तर कोकणमधून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप या ठिकाणी उमेदवार देणार का, याकडे लक्ष लागलं आहे.