ज्येष्ठ नागरिकांचं वय लवकरच 65 वरुन 60 वर
Continues below advertisement
लवकरच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वरुन 60 होणार आहे. महिन्याभरात नवीन निर्णय लागू करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी केली आहे. यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढणार असून अनेकांना सवलतीच्या दरात एसटी पास आणि वृद्धापकाळातील निवृत्ती योजनांचा आर्थिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, यामुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल 200 कोटींचा बोजा पडणार आहे.
Continues below advertisement