मुंबई : दोन दिवसांपासून रजिस्ट्रार ऑफिसचा सर्व्हर बंद, नागरिकांचा खोळंबा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र सरकारच्या रजिस्ट्रार ऑफिसचा सर्व्हर कालपासून (शुक्रवार) बंद आहे. यामुळं राज्यभरातील सह निबंधक कार्यालये काल बंद होती. तर आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार) या कार्यालयांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे नागरिकांचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
काल अनेक जिल्ह्यातल्या सहनिबंधक कार्यालयात नागरिकांच्या मोठ्याच मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. पण सर्व्हरच बंद झाल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप करावा लागत आहे. खरं तर आज सर्व्हर सुरळीत होणं अपेक्षित होतं, पण अजूनही सर्व्हर डाऊनच असल्याचं कळतं आहे.