मुंबई : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहनासाठी दाम्पत्यापैकी एकाला सरकारी नोकरीत प्राधान्य
Continues below advertisement
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या जीवाला अनेक वेळा 'सैराट' चित्रपटाप्रमाणे धोका निर्माण होतो. अशा जोडप्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवा कायदा करण्याच्या तयारीत आहे.
महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे. जाती-धर्माबाहेर विवाह करणाऱ्या युवक-युवतींना सामाजिक बहिष्कार किंवा ऑनर किलिंग यासारख्या परिणामांना सामोरं जावं लागतं. अशा जोडप्यांच्या समस्या कमी करुन त्यांना सामाजिक सुरक्षा पुरवण्याच्या दृष्टीने राज्य सरकार पावलं टाकत आहे.
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना कोणत्याही लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही. आंतरधर्मीय विवाहातील स्पेशल मॅरेज अॅक्टमध्ये असलेल्या त्रुटी सुधारल्या जाणार आहेत.