Vayu Cyclone Effect | 'वायू' चक्रीवादळामुळं मान्सूनचं आगमन खोळंबलं, हवामान विभागाची माहिती | ABP Majha
Continues below advertisement
बातमी चिंतेत टाकणारी...एव्हाना मान्सून राज्यात सक्रिय व्हायला हवा होता.. मात्र वायू चक्रीवादळामुळे मान्सून कोकणात पोहोचायला आणखी 1 आठवडा लागण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीए.. वायू चक्रीवादळामुळे मान्सून अद्याप केरळमध्येच अडकून पडलाय. संपूर्ण राज्यात सध्या मान्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहिली जातेय. मात्र पाऊस आणखी एक आठवडा रखडल्यानं बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडलीए.
Continues below advertisement