मुंबई : राज्यात दूध दरासाठी 'स्वाभिमानी', तर आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
Continues below advertisement
गेल्या तीन दिवसांपासून राज्यात दूध आंदोलन तापलंय मात्र अद्याप दिल्लीपासून नागपूरपर्यंत दूध उत्पादकांच्या मागणीवर तोडगा निघालेला नाहीए... यामुळे आता आंदोलनाची धार वाढलीए... स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पालघरच्या बोईसरमधील अमूल डेअरी बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलंय...शिवाय राज्यात स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी दूध आंदोलन कायम ठेवलयं... तर तिकडे मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय... बीडच्या परळीमध्ये दुपारपासून सुरु असलेलं आंदोलन अजूनही कायम आहे... आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना महापूजा करु देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला.
Continues below advertisement