स्पेशल रिपोर्ट : शेतकऱ्यांचं राज्यभरात दूध आंदोलन, सर्वपक्षीयांचा पाठिंबा

Continues below advertisement
दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्रीपासून सुरु केलेलं आंदोलन आता चिघळलंय. अनेक प्रमुख शहरांना होणारा दुधपुरवठा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आज रोखला आहे. दरम्यान, मुंबईच्या दुधपुरवठ्यावर अद्याप याचा कोणताही परिणाम झाला नसल्य़ाचं पाहायला मिळत आहे.
दुधाला प्रतिलिटर ५ रुपयांचं अनुदान देण्याच्या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. आज राज्यात विविध ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर दूध अडवलं. काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून देण्यात आलं. तर कुठे आंदोलनात सहभागी होत दूध उत्पादकांनी दुधाचा सुयोग्य वापर केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram