महाराष्ट्र केसरी 2018 | जालना | महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाचं गालबोट | एबीपी माझा
Continues below advertisement
जालन्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. पण पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांनी महाराष्ट्र केसरीतून माघार घेतल्याची बातमी मिळतेय. आज सकाळच्या सत्रात मॅट विभागात पैलवान अभिजीत कटके आणि हिंगोलीचा गणेश जगताप यांच्यातल्या कुस्तीच्या निकालाबाबत गणेशचा थोरला बंधू अण्णा जगताप आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांनी आक्षेप घेतला होता. त्यावर योग्य निर्णय न झाल्यानं अर्जुनवीर काका पवार यांच्य़ा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील पैलवानांनी महाराष्ट्र केसरीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement