मुंबई : बारावीचा विभागवार निकाल
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणं यंदाही कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागात सर्वाधिक ९४.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक विभागाचा लागलाय. राज्य़ातून १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. विशेष म्हणजे यंदा नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची लक्षणीय आहे. ९० टक्क्याहून अधिक गुण मिळवणारे सर्वाधिक म्हणजेच ७९० विद्यार्थी एकट्या पुणे विभागातले आहेत. तर त्याखालोखाल नागपूर विभागात ६९८ विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.