मुंबई : मुंबईसह कोकणाचा पारा चढला, रायगडमधील भिरात सर्वाधिक तापमान

Continues below advertisement
दुपारच्या वेळी तुम्हाला उन्हात बाहेर पडायचं असेल तर काळजी घ्या.. कारण, मुंबईसह कोकणामध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. रायगड जिल्ह्यातल्या भिरामध्ये काल तब्बल 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुंबईतही तब्बल 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबई, पुणे, नाशिकमध्येही उन्हाने लोक हैराण झाले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा 42 अंशावर पोहोचल्याने येणाऱ्या काळात उन्हाचा तडाखा चांगलाच बसण्याची भीती आहे. आतापर्यंत या महिन्यात नोंदवलेलं हे सर्वाधिक तापमान आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram