मुंबई : रम्मी खेळात चार खेळाडूंची सक्ती, राज्य सरकारच्या नियमाला हायकोर्टात आव्हान
रम्मी खेळताना चार खेळाडूंच्या सक्तीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. राज्य सरकारने रम्मी खेळताना चार खेळाडुंची सक्ती केली होती. राज्य सरकारच्या याच नियमाला पुण्यातल्या स्पर्धात्मक रम्मी खेळाडू संघटनांनी विरोध दर्शवत याचिका दाखल केलीये. राज्य सरकारला आता उत्तर देण्यासाठी तिन आठवड्यांची मुदत देण्यात आलीये. यासंदर्भात 13 मार्चला पुढील सुनावणी आहे.