Dam Overflow | पावसाच्या जोरदार हजेरीमुळे राज्यातील प्रमुख धरणं ओव्हरफ्लो | ABP Majha
Continues below advertisement
पावसाच्या जोरदार हजेरीमुळं राज्यातली प्रमुख धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. साताऱ्यातल्या कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. कोयना धरणातून जवळपास ४१ हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशकात देखील जोरदार पावसामुळं नांदूर मध्यमेश्वर धरण भरलं असून, प्रकल्पातून जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडण्यात आलंय. अर्थात याचा फायदा औरंगाबादला होणार आहे.. मुंबईतला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि शहापूरमध्ये असलेल्या भातसा धरणातून देखील विसर्ग सुरू आहे. डोळ्याचे पारणे फेडणारी ही दृश्य आहेत. तिकडे विदर्भात देखील पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं भंडारा धरणातून पाणी सोडण्यात आलंय.
Continues below advertisement