Maharashtra co-op bank scam | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी नेते सुप्रीम कोर्टात | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आता बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षातील बड्या नेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेवरील सुनावणीदरम्यान घोटाळ्यात सहभागी संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावर संचालक मंडळाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. यात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी कऱण्यात आलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram