सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणातले समुद्रकिनारे फुलले, हजारो पर्यटक दाखल
Continues below advertisement
नाताळ आणि वर्षाअखेरीचा योग साधत राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येनं कोकणात येऊ लागले आहेत़. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिनही जिल्ह्यातील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत.
रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळे,आंजर्ले, हर्णे याठिकाणी पर्यटकांची मोठी संख्या दिसून येत आह़े. रत्नागिरी नव्याने सुरु झालेले स्कुबा डायव्हिंग आणि व्हॅली क्रॉसिंग या पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे
तर रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड , श्रीवर्धन या समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. इथे आलेले पर्यटक बोटींग, राफ्टिंग यासारख्या ऍडव्हेंचर्सचा आनंद घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर काही पर्य़टक आपल्या सुट्टीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी थेट गोव्यात पोहोचले आहेत.