Child Mortality Ratio | राज्यात बाल मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती | ABP Majha

राज्यात बाल मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिलीय. 2018 ते 2019 दरम्यान तब्बल 16 हजार 539 बालकांचा मृत्यू झाल्याचं शिंदेंनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे राज्यात 1 हजार 828 प्राथमिक आरोग्य केंद्र, 10 हजार 668 उपकेंद्र, 462 आयुर्वेदिक दवाखाने आहेत. त्याचबरोबर 281 भरारी पथकं काम करत आहेत. तरीही बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यात सरकारला अपयश आलंय. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहीमे अंतर्गत अर्भकाचा किंवा बालकांचा मृत्यू दर 10 पर्यंत आणण्याचं उद्दिष्ट फोल ठरल्याचंच यावरुन स्पष्ट होतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram