मुंबई : मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, कुणाकुणाची वर्णी लागणार?
Continues below advertisement
कुणाकुणाला मंत्रीपद द्यायचं याचा विचार मुख्यमंत्री परदेशातूनच करुन आले आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार निश्चितपणे होईल, असे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. काही महामंडळाच्या घोषणा झाल्या आहेत. बाकी महामंडळांच्या घोषणाही लवकरच होतील असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपची कोअर कमिटी आणि मित्रपक्ष अर्थात शिवसेनेशी चर्चा करुन योग्य विस्तार होणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे आता नवीन मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागते. पाडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेलं कृषी खातं कुणाला मिळतं आणि युतीसाठी आग्रही असलेला भाजप मित्रपक्ष शिवसेनेच्या पारड्यात किती मंत्रिपदं टाकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Continues below advertisement