मुंबई : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन दुकानातून आता साखर मिळणार नाही
Continues below advertisement
मुंबई : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन दुकानांवर साखर मिळणार नाही. राज्यातील 45 लाख कुटुंबांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पूर्वीप्रमाणे साखर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेतील लेखी उत्तरात यासंदर्भात माहिती दिली.
दुसरीकडे अंत्योदय योजनेतील गरीब कुटुंबांना रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले आहेत. त्यामुळे अंत्योदय योजनेतील कुटुंबांना रेशनवर एक किलो साखर 20 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी एक किलो साखर 15 रुपयांना मिळत होती.