नवी दिल्ली : 500 पैकी 499 गुण, चार विद्यार्थी CBSE दहावीत अव्वल!

Continues below advertisement
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे 500 पैकी 499 गुण मिळवत एक, दोन नव्हे तर चार विद्यार्थी बोर्डात अव्वल आले आहेत.

या चार विद्यार्थ्यांमध्ये तीन मुलींचा समावेश आहे. प्रखर मित्तल (डीपीएस गुरुग्राम), रिमझिम अग्रवाल (आरपी पब्लिक स्कूल), नंदिनी गर्ग (शामली) आणि श्रीलक्ष्मी (भवानी विद्यालय कोच्ची) यांनी 499 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram