मुंबई : राज्यातील अनाथ मुलांना शिक्षण आणि नोकरीत एक टक्का आरक्षण

राज्य सरकारनं आज अनाथ मुलांना शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गात 1 टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनाथाश्रम सोडल्यानंतर शिक्षण आणि नोकरीमध्ये अडथळे येणाऱ्या समस्त अनाथ मुलांना त्याचा थेट फायदा होणार आहे. या निर्णयानुसार, आता शासकीय नोकरीतल्या अर्जावर जातीच्या रकान्यांसोबत आता अनाथ असाही रकाना असणार आहे. ज्यामुळे शासकीय नोकरी 1 टक्के आरक्षण तर मिळेलच, शिवाय अनाथ मुलांसाठी आता जातीची कटकट राहणार नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola