Mahabaleshwar Rainfall | महाबळेश्वरमध्ये यंदा विक्रमी पाऊस, चेरापुंजी, मौसिनरामलाही मागे टाकलं | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरने यंदा पावसाचे विक्रम मोडलेत. महाबळेश्वरने मेघालयातील चेरापुंजीसह मौसिनरामलाही मागे टाकलंय. यंदाच्या हंगामात महाबळेश्वरमध्ये तब्बल तीनशे इंच पावसाची नोंद झालीय. १ जून ते ८ सप्टेंबर या कालावधीत चेरापुंजीत २४० इंच तर मौसिनराम इथं २४५ इंच पावसाची नोंद झालीय. तब्बल तेरा वर्षांनंतर महाबळेश्वरमध्ये या कालावधीत तीनशे इंच इतक्या विक्रमी पावसाची नोंद झालीय. गेल्या वर्षी याच कालावधीत महाबळेश्वरमध्ये २३७ इंच पावसाची नोंद झाली होती. कोकण, पश्चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर असं ठिकाण आहे जिथे नेहमी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो.
Continues below advertisement