Magician Death | जादू दाखवताना मॅंड्रेक यांची नदीत जीवघेणी उडी,दोन दिवसांनी मृतदेह बाहेर | कोलकाता | ABP Majha
कोलकात्याच्या हावडा ब्रीजवर जादूगार मँड्रेक अर्थात चंचल लाहिरी यांचा जीवघेणा प्रयोग करताना मृत्यू झाल्याचं समोर आलं. रविवारी दुपारी मँड्रेक यांनी हातपाय कुलूपानं बांधून कोलकात्यातल्या हुगळी नदीत उडी मारली. मात्र, त्यानंतर ते तरंगत वर येणं अपेक्षित होतं. मात्र, जादूनंतर ते वेळेत न आल्यानं गायब झाल्याची चर्चा झाली. त्यानंतर अखेर दोन दिवसांनी जादूगार चंचल लाहिरी यांचा मृतदेह सापडल्याची माहिती आहे.