भोपाळ : देवासमधील छापखान्यातून नोटांची चोरी, पोलीस अटकेत

Continues below advertisement
घर, दुकानं किंवा बँकांमधून पैसे चोरीच्या अऩेक घटना घडतात, मात्र मध्य प्रदेशातल्या देवासमध्ये चक्क नोटांच्या छपाई कारखान्यातून लाखोंची चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे.  मागच्या 3 महिन्यांपासून छपाई कारखान्यात अधिकारीपदावर असणाऱ्या पोलीस निरीक्षकानंच नोटांची बंडलं लांबवण्याचा उद्योग सुरु केला होता.. आपल्या बुटात पाचशे-पाचशे रुपयांची बंडलं लपवून त्याने हा काळाबाजार सुरु केला.  मनोहर वर्मा असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्याने त्याची तपासणी होत नव्हती, याचाच फायदा घेऊन मागच्या 3 महिन्यात मनोहर वर्मानं तब्बल 90 लाख रुपये चोरल्याची माहिती आहे. काल त्याला रंगेहाथ पकडलं गेलं.  नोटांची पडताळणी करुन त्या कायम ठेवणं किंवा त्यांना रद्द करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram