सागर, मध्य प्रदेश : लग्नामध्ये हत्तीचं थैमान, हत्तीवर ताबा मिळवण्यासाठी पोलिसांची प्रयत्नांची शर्थ
Continues below advertisement
मध्य प्रदेशातल्या सागर शहरात एका हत्तीनं चांगलंच थैमान घातलं. इथल्या एका व्यापाऱ्याच्या लग्नासाठी हत्ती आणि उंट मागवण्यात आले होते. यावेळी बॅण्ड-बाजाच्या आवाजामुळं यातील एक हत्ती बिथरला आणि सो सरळ बाजाराच्या दिशेनं धावत सुटला. माहुताचा हत्तीवरचा ताबा सुटल्यानं तो सरळ शहराच्या मध्य भागात शिरला..यावेळी पोलिसांसह स्थानिक नागरिकांचीही चांगलीच धांदल उडाली..बऱ्याच वेळाच्या प्रयत्नानंतर हत्तीवरती ताबा मिळवता आला.. मात्र तोपर्यंत शहरात अनेक ठिकाणी हत्तीनं मालमत्तेची हानी केली होती.
Continues below advertisement