Panna Tiger Reserve | पन्ना व्याघ्र प्रकल्पात पाच नव्या पाहुण्यांचं आगमन | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 May 2019 01:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पन्ना व्याघ्र प्रकल्पातून आनंदाची बातमी.... पन्ना व्याघ्र प्रकल्पात ५ नव्या पाहुण्यांचं आगमन झालंय. या व्याघ्र प्रकल्पातील गहरी घाट भागात टी ६ वाघिणीनं दोन बछड्यांना जन्म दिलाय. बछड्यांसह वाघिणीची प्रकृती स्थिर आहे. तर महिनाभरापूर्वीच अमानगंज परिसरात एका वाघिणीनं ३ बछड्यांना जन्म दिला होता. त्यामुळे पन्ना व्याघ्र प्रकल्पात आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे वाघ संवर्धनाच्या मोहिमेतील वाघांची संख्याही हळूहळू वाढतेय. तर २००९ साली याच पन्ना व्याघ्र प्रकल्पात एकही वाघ जिवंत नव्हता असं सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही.