जॅकलीनचा 'एक दो तीन' डान्स पाहून माधुरी नाखुश?
Continues below advertisement
श्रीलंकन ब्यूटी जॅकलीन फर्नांडिसने माधुरी दीक्षितला ट्रिब्युट म्हणून 'तेजाब' चित्रपटातील गाजलेल्या 'एक दो तीन' या गाण्याचं रिक्रिएशन केलं. मात्र जॅकलीनचा हा प्रयत्न माधुरीला रुचलेला दिसत नाही. माधुरी जॅकलीनचा डान्स पाहून नाखुश असल्याचं म्हटलं जात आहे.
1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेजाब चित्रपटातील हे गाणं अलका याज्ञिक यांनी गायलं होतं. दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांनी गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं. मूळ गाण्यात बॅक डान्सर असलेल्या गणेश आचार्यने नव्या 'एक दो तीन'ची कोरिओग्राफी केली आहे.
'बागी 2' चित्रपटातील 'एक दो तीन' गाणं रीलिज झाल्यानंतर जॅकलीन आणि माधुरी यांची तुलना होणं साहजिकच होतं. मात्र तेजाब चित्रपटातील माधुरीचा नृत्याविष्कार अलौकिक होता, असं तिचे चाहते आवर्जून सांगतात. जॅकलीन नव्या गाण्यात हॉट दिसत असली, तरी माधुरीने ग्रेसफुली डान्स केल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.