VIDEO | माढ्याचे उमेदवार संजय शिंदे आणि बबन शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचा समावेश आहे. उदयनराजे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, चंद्रकांत खैरे यासारख्या दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर सतत चर्चेत राहिलेल्या माढा, अहमदनगर, जालना, सातारा, जळगाव या जागांचा समावेश या टप्प्यात आहे. देशभरातील 15 राज्यांतील 116 जागांसाठी आज मतदान होईल.