लखनौ : पासपोर्ट हवा असेल तर आधी हिंदू धर्म स्वीकारा, पासपोर्ट अधिकाऱ्याचं धक्कादायक उत्तर
Continues below advertisement
तुम्हाला पासपोर्ट हवा असेल तर आधी हिंदू धर्म स्वीकारा असं म्हणत लखनौच्या पासपोर्ट कार्यालायात हिंदू-मुस्लिम दांपत्याचा अपमान करण्यात आला आहे. अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ यांनी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्यावेळी विकास मिश्रा नावाच्या अधिकाऱ्यानं त्यांना हे धक्कादायक उत्तर दिलं आहे. वागणुकीमुळे धक्का बसलेल्या दांपत्याने सुषमा स्वराज यांच्याकडे तक्रार करत मध्यस्थी करण्याची मागणी केली. याप्रकरणी विकास मिश्रा या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.
Continues below advertisement