लखनौ/ उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून 'त्या' जखमी विद्यार्थ्याची विचारपूस
Continues below advertisement
शाळेला सुट्टी मिळण्यासाठी सातवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकुनं हल्ला केला. लखनऊच्या ब्राईट लँड स्कूलमध्ये हा प्रकार घडला. जखमी विद्यार्थावर लखनऊच्या ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. तर घटनेत पोलिसांनी सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनीला आणि प्रकरण लपवल्यामुळं मुख्यध्यापिकेलाही अटक केली आहे. गुरुग्राम हायस्कूलमध्ये प्रद्युम्न हत्येप्रकरण ताजं असतानाच आता ही दुसरी घटना समोर आली आहे. दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्याची विचारपूस केली.
Continues below advertisement