मुंबई : लोअर परेलचा रेल्वे ब्रिज धोकादायक, 24 जुलैपासून दुरुस्तीपर्यंत बंद राहणार

Continues below advertisement
लोअर परेलचा रेल्वे ब्रिज (ना. म. जोशी मार्ग) वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी बंद केला जाणार आहे. या ब्रिजच्या दुरुस्तीचं काम 24 जुलैपासून सुरु केले जाणार आहे. त्यामुळे 24 जुलैपासून दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत ब्रिज बंद राहील. मुंबईतील अंधेरीच्या गोखले पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर रेल्व प्रशासन, आयआयटी मुंबई आणि महापालिका अधिकारी यांनी केलेल्या सेफ्टी ऑडिटनंतर लोअर परेल रेल्वे ब्रिज हा धोकादायक असून तो तात्काळ बंद करण्यात, यावा असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षतेसाठी लोअर परेल रेल्वे ब्रिज (ना. म. जोशी मार्ग) हा वाहनांना वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना बंद करण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram