मुंबई : लोअर परेलचा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने नोकरदारांचे हाल
लोअर परळचा धोकादायक पूल बंद करण्यात आल्यापासून नोकरदारांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या परिसरातून चालताना अगदी जीव मुठीत घेऊनच पादचाऱ्यांनी आपले नोकरीचे ठिकाण गाठावे लागत आहे. त्यामुळे आता कॉर्पोरेट कंपन्यांच्या वेळा बदलण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. पुलावर चेंगराचेंगरीचा प्रसंग उद्भवत असल्याने, प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.