कमला मिल्स कंपाऊंड आग : मृत प्रीती राजगिरीयाचे भाऊ अजय यांच्याशी बातचीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Dec 2017 12:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या लोअर परेल येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.