मुंबई : लोअर परेल पुलावरून सेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा
वाहतुकीसाठी बंद असलेल्या लोअर परेलच्या पुलावरुन शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. लोअर परेलच्या पुलावर शिवसेनेच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी सुनिल शिंदे आणि संतोष धुरी यांनी एकमेकांना शिवीगाळही केली. मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या पाहणी दौऱ्यात घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी परिसरात प्रचंड गदारोळदेखील झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.