कमला मिल्स कम्पाऊंड आग : अनधिकृत हॉटेलवरील कारवाई आजही सुरु राहणार
कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवात १४ निष्पाप लोकांचा बळी गेल्यावर मुंबई महापालिकेला जाग आलीय. काल महापालिकेनं कमला मील भागातल्या चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली. आजही ही कारवाई सुरुच राहणार आहे. अनधिकृत बांधकाम आणि निहमबाह्य व्यवस्थापन असणाऱ्या हॉटेलांवर कारवाई केली जातेय.