हायपोटेन्शन- कमी रक्तदाबाची लक्षणं आणि त्यावरील उपाय | आरोग्य | एबीपी माझा
घे भरारीच्या आजच्या भागात कमी रक्तदाबाची लक्षणं आणि त्यावरील उपाय आपण पाहणार आहोत. हायपोटेन्शन या व्याधीला सर्वसाधारणपणे लो ब्लडप्रेशर असे म्हणतात. या व्याधीमध्ये शरीरातील धमन्यांमध्ये रक्तदाब कमी होतो. काही वेळा हा रक्तदाब इतका कमी होतो, की रक्त सर्व अवयवांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे गरगरणे, चक्कर येणे, शुद्ध हरपणे असे प्रकारही घडू शकतात. १३०/९० हे रक्तदाबाचे रीडिंग आता नॉर्मल समजले जाते. यापैकी जो आकडा जास्त आहे, तो ‘सिस्टॉलिक प्रेशर’ दर्शवितो. हे प्रेशर, हृदय धमन्यांमध्ये रक्त ‘ पंप ‘ करते, आणि धमन्यांमध्ये रक्त भरते, तेव्हाचे असते.