लंडन : ब्रिटीश राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स विल्यम-केट मिडलटनला तिसरं अपत्य
Continues below advertisement
प्रिंस विल्यमची पत्नी केट मिडलटनने तिसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. बाळाची आणि आईची तब्येत पूर्णपणे ठीक असल्याची माहिती ड़ॉक्टरांनी दिली आहे. केटने सोमवारी सकाळी 11 वाजता लंडन येथील सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. मुलाच्या जन्मावेळी प्रिन्स विलियम स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. नवजात बाळाचं चार किलो वजन आहे.
Continues below advertisement