लंडन : लंडनमधील सार्वजनिक बसच्या इंधनासाठी कॉफीचा वापर
Continues below advertisement
आता एक आश्चर्यकारक बातमी... कॉफी प्यायल्यानंतर फ्रेश वाटतं, उत्साही वाटतं, असं आपण अनेकदा म्हणतो पण आता हीच कॉफी इंधन म्हणून वापरली जात असेल तर... लंडनमध्ये हे खरंच होतंय... लंडन शहरातल्या सार्वजनिक वाहतुकीचा मोठा आधार असलेल्या बसमध्ये इंधन म्हणून चक्क कॉफीच्या चोथ्यापासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर केला जातोय...
सध्या प्रायोगिक तत्वावर ही मोहीम लंडन शहरात सुरु करण्यात आलीय... जर हा प्रयोग यशस्वी झाला तर हेच इंधन इतर वाहनांसाठीही वापरता येईल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. लंडनमधील ‘बायो-बीन लिमिटेड’ या कंपनीच्या वतीनं हा प्रयोग राबवण्यात येतोय...
Continues below advertisement