लोणावळा : कार्ल्यातील एकविरा देवी मंदिराचा सोन्याचा मुलामा असलेला कळस चोरीला
Continues below advertisement
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या लोणावळ्याजवळील कार्ला गडावरील एकविरा देवी मंदिराचा कळस चोरीला गेला आहे. कार्ला गडावर मध्यरात्री कळसाची चोरी झाली. या कळसाला सोन्याचा मुलामा होता. साधारण सव्वा लाख रुपये किमतीचा हा कळस होता. एका भक्ताने हा कळस दान दिला होता.
Continues below advertisement