पुणे : लोणावळ्यात 24 तासात 285 मिमी पाऊस, इंद्रायणीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
लोणावळ्यात चोवीस तासात 285 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या या जोरदार बॅटिंगमुळे संपूर्ण शहर पाणीमय झालं आहे. तसेच इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे शनिवार-रविवार पर्यटकांनी गजबजलेल्या लोणावळ्याच्या रस्त्यावर पाणीच-पाणी झालं आहे. दुसरीकडे नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने नदी किनारच्या रहिवाश्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. तीन दिवसापासून शहरात पावसाने जोर कायम धरल्याने 581 मिलिमीटरची तर चालू वर्षी आत्तापर्यंत 2391 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Continues below advertisement