लोणावळा : प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासरावचा अपघात

Continues below advertisement
अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला आहे.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरकडे जात असताना, त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे जखमी झाली आहे. प्रार्थनाच्या हाताला दुखापत झाली आहे.

अनिकेत आणि प्रार्थना हे दोघे आगामी मस्का या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरकडे निघाले होते. त्यावेळी आज सकाळी 8 च्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.

दरम्यान, जखमी प्रार्थना बेहेरेला लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram