VIDEO | जागा वाटपाबद्दल उद्धव ठाकरे आणि अमित शाहांमध्ये चर्चा | मुंबई | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपने शिवसेनेशी युतीच्या प्रयत्नांना सोमवारी वेग दिला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून जागावाटपाबाबत चर्चा केली. मात्र, उद्धव यांनी ‘मोठय़ा भावा’चा आग्रह कायम ठेवत १९९५ च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव शाहांपुढे ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.