VIDEO | वंचित आघाडीचं बटण दाबलं की भाजपला मत : आंबेडकर | सोलापूर | एबीपी माझा
वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हा समोरील बटण दाबल्यास कमळाला मत जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर आणि मुलगा सुजात आंबेडकर यांनी केलाय. यासंदर्भातील तक्रार मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी मशीन सील केल्याचा दावाही आंबेडकरांनी केलाय. दरम्यान, आंबेडकर पिता-पूत्रांचे आरोप निराधार असल्याचं स्पष्टीकरण सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केलंय.